संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील खंडेरायवाडी फाटा जवळील गवळीबाबा येथे दोन मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात दादासाहेब दत्तात्रय कोल्हे ( वय ४०) रा. कोल्हेवाडी ता. संगमनेर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच योगेश संजय बर्डे (वय २३) रा.खरशिंदे ता. संगमनेर हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने संगमनेर येथील कुटे रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त लवकरच….
