बापरे! साकूरच्या बाजारतळावरच गळफास घेऊन आत्महत्या 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) अनंत चतुर्दशीच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बन वस्ती शिवारात दोन सख्ख्या चुलत बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच एका ५५ वर्षीय व्यक्तीने साकूर बाजारतळावरच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना वार – शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. त्यामुळे साकूरमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. लक्ष्मण कदम ( वय ५५) मुळ रा. वावरथ जांभळी ता. राहुरी, जि.अहिल्यानगर हल्ला रा. साकूर ता. संगमनेर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मण कदम उदरनिर्वाहासाठी साकूरमध्ये काम करत होता. ते राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी येथील रहिवासी असून साकूर येथे कामानिमित्त काही दिवसांपूर्वी आले होते. तसेच ते साकूर येथेच गेल्या काही वर्षांपासून राहत होते. मात्र लक्ष्मण कदम यांनी साकूर बाजारतळावरील झाडाच्या फांदीला च गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ग्रामस्थ गावात येत असताना त्यांना हा प्रकार दिसला. त्यानंतर घारगाव पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर लक्ष्मण कदम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटिर रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. मात्र लक्ष्मण कदम यांनी आत्महत्या का केली? याच कारण अस्पष्ट आहे

Leave a Comment