संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना साकूरला ये – जा करण्यासाठी सकाळी कोणतीही बससेवेची व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी मोठी हाल होत असल्याने याकडे भाजपा कायदा सेलचे जिल्हा संयोजक विधिज्ञ अमित धुळगंड यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांचे लक्ष वेधत संगमनेर आगाराच्या बस फेर्या सुरु करण्याची मागणी लेखी निवेदना द्वारे केली आहे. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख हे उपस्थित होते.
मांडवे बुद्रुक परिसरातील अनेक शालेय विद्यार्थी साकूर येथे शिक्षणासाठी येत असतात. मात्र दररोज सकाळी खाजगी वाहनाने प्रवास करत शाळेत यावे लागते. सकाळच्या वेळी एकही बससेवा नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. मात्र जाण्यासाठी व परतण्यासाठी बससेवेची अत्यंत गरज आहे. त्यामुळे भाजपा कायदा सेलचे जिल्हा संयोजक विधिज्ञ अमित धुळगंड यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेत बससेवेच्या फेऱ्या सुरू करण्याची मागणी केली. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी तातडीने याबाबत संगमनेर आगाराला सूचना केल्या.
