बिग ब्रेकिंग! चंदनापुरी घाटात दगड कोसळले

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात रविवारी सकाळी दरडीचे दगड कोसळल्याचे समोर आले आहे. पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या लेनवरील रस्त्याच्या मधोमध मोठा दगड कोसळल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. दरम्यान सुदैवाने कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती आहे.

तसेच सुरक्षा उपाय म्हणून दरडींना संरक्षक जाळ्या बसवून देखील दरडी कोसळत असल्याने महामार्गावरील प्रवास सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपासून संगमनेर तालुक्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. तसेच चंदनापुरी घाटातील दरडी कोसळण्याच्या संभाव्य जागी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जाळी बसविली आहे. मात्र तरीदेखील घाटात दरडीचे दगड कोसळले.

Leave a Comment