मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल उत्तम राहील.
वृषभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.
कर्क : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.
कन्या : प्रियजनांचा सहवास लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
तुळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
धनु : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.
मकर : आपल्या मतांबद्दल आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय होतील.
