राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. या निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोव्हेंबर अखेरपर्यंतचा वेळ दिला होता. पण सरकारने कोर्टात धाव घेत मुदतवाढीसाठी अर्ज केला होता.
याबाबत आज कोर्टात सुनावणी झाली तेव्हा कोर्टाने निवडणुका घेण्यासाठी अंतिम मुदतवाढ दिली. ३१ जानेवारी २०२६ च्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले. राज्यातील या निवडणुका कशा होणार याबाबत देखील माहिती समोर आली आहे. या निवडणुका दोन ते तीन टप्प्यात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असा अंदाज वर्तवला जात आहे की, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि पंचायत समितींच्या निवडणुका एका टप्प्यात होतील. या सर्व निवडणुका डिसेंबर २०२५ च्या अखेरीपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई महानगर पालिका सोडून राज्यातील इतर महानगर पालिकांच्या निवडणुका होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
त्यानंतर मुंबई महानगर पालिकेची निवडणूक पार पडले. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जानेवारीच्या अखेरीस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच, जर तयारी पूर्ण नाही झाली तर मुंबईत महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी फेब्रुवारी उजडतो का? हे पहावे लागणार आहे.
