संगमनेर(DSNews24/किरण पुरी) सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सोसायटीसह विविध सहकारी व पतसंस्थाची वार्षिक सर्वसाधारण सभा वार – गुरूवार दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व संस्थांच्या सभा होणार आहे.
साकूर येथील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेली साकूर विविध विकास कार्यकारी सोसायटीचा नावलौकिक आहे. सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीचा अचूक कारभार सुरू आहे. त्यासोबतच सलग दोन वर्षे बॅंको बल्यु रिबन व दिपस्तंब पुरस्कार प्राप्त असलेली मुळा खोरे पतसंस्थेचाही चोख कारभार चेअरमन विठ्ठल मैड यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
याबरोबरच विरभद्र मुळाखोरे दूध संस्था, विरभद्र शेतकी साधन संस्था, विरभद्र देवस्थान ट्रस्ट, गजानन महाराज पाणीपुरवठा संस्था, विरभद्र पाणी वापर संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. जवळपास सात संस्थांची एकत्रित सभा असल्याने या सर्वसाधारण सभेत ज्या त्या संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सभासद, संचालक उपस्थित राहणार आहेत.
