विखे पाटलांच्या कार्यालयावर निघणार शेतकऱ्यांचा लॉंग मार्च ; भूमिपुत्रही सहभागी

संगमनेर : अखिल भारतीय किसान सभा व इतर समविचारी संघटनांनी 26, 27 व 28 एप्रिल रोजी मा. महसूल मंत्री व दुग्ध विकास मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथिल कार्यालयावर शेतकऱ्यांचा लॉंग मार्च आयोजित केलेला असून त्या लाँग मार्चला भूमिपुत्र शेतकरी संघटनेनी पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सक्रिय सहभाग घेऊन लाँग मार्च मध्ये सामील होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी दिली आहे.

सन २०१७ व २०१९ अशा दोन्ही कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी या योजनेत योग्य ते बदल करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे. दुग्ध पदार्थ आयात करण्याच्या सरकार दरबारी हालचाली सुरू असून त्या त्वरित थांबाव्यात शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला उत्पादन खर्चावर आधारित प्रति लिटर किमान 45 रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 65 रुपये भाव देण्यात यावा.

महाविकास आघाडी सरकारने दूध एफ आर पी बाबत स्थापन केलेल्या अजित पवार समितीच्या शिफारशी जाहीर कराव्यात दूध भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रस्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्यावी, परतीच्या अवकाळी पावसाने शेतीमालाचे अतोनात नुकसान झालेले आहे. सरकारने ऐन डी आर एफ अंतर्गत मदतीची घोषणा केली मात्र सदर पंचनामे व दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केल्याप्रमाणे एन डी आर एफ च्या निकषांपेक्षा दुप्पट मदत तातडीने जाहीर करावी.

वीज बिलांची सक्तीची वसुली थांबून विज बिल सरसकट माप करून शेतीला पूर्ण दाबाने दिवसा बारा तास वीज देण्यात यावी, विजेच्या तारांचे शेतात पडलेले झोळ दुरुस्त करून वीज वाहिन्यांची राज्यभर दुरुस्ती करावी.

पारनेर तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. दुष्काळी तालुका म्हणून ओळख पुसण्यासाठी कुकडीचे १ टी.एम.सी पाणी कान्हूर पठारच्या पठार भागाला मिळावे, त्या संदर्भात त्वरित सर्वे करण्यात यावा. २०१८ साली पिक विमा मंजूर होऊनही त्याचा लाभ शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत देण्यात आलेला नाही संबंधित कंपनीची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी.

हा लॉन्ग मार्च यशस्वी करण्यासाठी भूमिपुत्र संघटनेचे सचिव किरण वाबळे, अशोक आंधळे, संतोष हांडे, असिफ शेख, निलेश तळेकर, संतोष राम वाडेकर, संतोष वाबळे, सिताराम देठे, रावसाहेब झांबरे, बाळासाहेब वाळुंज, विशाल करंजुले, संजय भोर, राजु रोकडे, वसंत साठे, अविनाश देशमुख, महेश झावरे, सतीश तनपुरे, बबन जगताप, किसन पवार, नाना काशीद, संदीप जाधव, संतोष गागरे, गणेश शिंदे, पाटील काशीद, नंदन भोर, सुरेश गोळे, संदीप शिंदे, मंजाबापू वाडेकर, अन्सार पटेल, पांडुरंग पडवळ, नितीन बुरके यांच्यासह असंख्य कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत.

Leave a Comment