बिग ब्रेकिंग! शिंदे – फडणवीस सरकार कोसळणार

राज्यातील सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचे ४० लोकांचे राज्य आहे. सरकारचा ‘डेथ वॉरंट’ तयार आहे. आता फक्त त्यावर कोण आणि कधी सही करणार, हे ठरणे बाकी आहे.

पुढील १५ दिवसात राज्यातील हे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही. त्यांना आता पुष्पचक्र अर्पण करा, अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभेनिमित्त संजय राऊत जिल्ह्यात आले आहेत. सभेपूर्वी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढविला.

माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना खासदार राऊत म्हणाले की, आम्ही न्यायालयाच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहोत. राज्यातील सरकार पुढील १५ ते २० दिवसांत पडल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी न्यायालय निकाल देईल. तो या सरकारचा शेवटचा दिवस असेल. या सरकारचा ‘डेथ वॉरंट’ निघालेले आहे. आता सही कोणी आणि कधी करायची हे बाकी आहे.

Leave a Comment