पारनेर ब्रेकिंग! “अजित पवार गो बॅक” आंदोलन स्थगित, निघाला ‘हा’ तोडगा 

पारनेर (DSNews24/किरण पुरी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. २ ऑक्टोबरला दसरा मेळाव्याचे निमित्ताने पारनेर दौऱ्यावर येत असल्याचे समजताच त्यांच्या नियोजित दौर्‍याला “अजित पवार – गो – बॅक ” आंदोलनाने विरोध करण्याचा इशारा पारनेर कारखाना बचाव समिती व भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने दिला होता.

मात्र हा इशारा देताच प्रशासनाने तातडीने याकडे गांभीर्याने लक्ष देत पारनेर साखर कारखाना प्रश्नी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केल्यामुळे २ ऑक्टोबरचे नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आला आहे. या प्रश्नी कारखाना बचाव समिती व भुमिपुत्र शेतकरी संघटना यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या प्रश्नी आमदार काशिनाथ दाते सर आणि रा. काँ. जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत यांनी प्रयत्न करून बैठकीचे आयोजन केले असून हि बैठक दि.७.१०.२०२५ रोजी मंत्रालयात होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकारमंत्री, पारनेरचे आमदार काशिनाथ दाते सर, सहकार सचिव, साखर आयुक्त, सहकार आयुक्त, राज्य सहकारी बॅक, क्रांती शुगर कंपणी, कारखाना बचाव समिती व भूमिपुत्र शेतकरी संघटना यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे.

तसे लेखी पत्र प्राप्त होताच नियोजित आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर पत्र पारनेर तहसीलदार व पोलिस निरीक्षक पारनेर यांना देण्यात आले. यावेळी दोन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे यांच्यासह साहेबराव मोरे, मनोज तामखडे, संतोष वाबळे, रामदास सालके, प्रवीण खोडदे, वसंत साठे, सुभाष करंजुले, गोरक्ष पठारे, बाळासाहेब वाळुंज, अन्सार पटेल, रघुनाथ मांडगे, राहुल गुंड, प्रशांत औटी, सोमनाथ गोपाळे, अनिल सोबले, संभाजी सालके, अंकुश कोल्हे, रामदास सालके, गोविंद बडवे, बाबाजी वाढवणे, ज्ञानेश्वर काळे, महेंद्र पांढरकर, अरुण बेलकर, जालिंदर लंके,नंदन भोर आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment