संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील मांडवे बुद्रुक ते साकूरफाटा या राज्यमार्गाच्या साईटपट्ट्यांची दयनीय अवस्था झाली असून या साईडपट्ट्यांची दुरुस्ती करण्याची मागणी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, साकूर फाटा ते मांडवे बुद्रुक राज्यमार्गावर अनेक ठिकाणी साईडपट्ट्याच काढलेल्या नाहीत. यामुळे रस्त्यावरुन दोन मोठी वाहने पास होण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसेच वाहन रस्त्यावरुन खाली उतरवताना साईडपट्टीच नसल्याने डांबरी रस्त्यालगत कपार निर्माण झाल्याने वाहतुकीसाठी धोक्याचे झाले आहे. तसेच दुचाकीस्वारांना देखील वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.
यामुळे अनेक अपघात देखील घडत आहे. विशेषकरुन साकूर ते मांडवे या रस्त्यावर वाहतुक मोठ्या प्रमाणावर वाढली असुन साईडपट्ट्या नसल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे मांडवे बु येथील तालुका हद्द ते नाशिक – पुणे महामार्गावरील साकूरफाटा पर्यंत रस्त्यावर साईडपट्ट्यांची दुरुस्ती करावी. या निवेदनाची आमदार अमोल खताळ यांनी तत्काळ दखल घेत सावर्जनिक बांधकाम विभाग,संगमनेर यांना सुचना केल्या आहेत.
यावेळी भाजपा कायदा सेल चे जिल्हा संयोजक ॲड. अमित धुळगंड उपस्थित होते.
