मेष : प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. काहींना प्रवासाचे योग येतील.
वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
कर्क : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.
कन्या : संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवीन परिचय होतील.
कुंभ : कोणालाही जामीन राहू नका. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
