श्रीरामपुर(DSNews24/किरण पुरी) – काही दिवसांपूर्वी भाजपा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी रऊफ शेख यांची पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली होती. त्यानंतर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर तसेच अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा दौर्याचा शुभारंभ केलाय. या दौऱ्यात रऊफ शेख यांनी संघटन बांधणीवर जोर दिला आहे. नुकतेच श्रीरामपुर येथे रऊफ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
यावेळी रऊफ शेख यांनी शहर अध्यक्ष पदी आसिफ पोपटिया यांची फेरनिवड झाल्या बद्दल सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. या बैठकीत रऊफ शेख यांनी संघटन बांधणीचा आढावा घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थित कार्यकर्त्यांच्या अडचणी समजावुन घेत त्यांना मार्गदर्शन केले व भविष्यात पुर्ण ताकदीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष निवडीनंतर प्रथमच श्रीरामपुर शहरात आलेल्या रऊफ शेख यांचे उत्साहात स्वागत करत सत्कार केला. बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर येथे मस्जिद परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष फत्तुभाई सय्यद, शहर अध्यक्ष आसिफ पोपटिया, अजीजभाई शेख, मोहसीन सय्यद, साजिद शेख, माजित पठाण, अन्वर तांबोळी, आरिफ बागवान, समीर शेख, मलंग शेख, जावेद शेख, शफीक बागवान आदि पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
