आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

 

कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

 

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.मनोरंजनाकडे कल राहील.

 

कन्या : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

तुळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

वृश्‍चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

धनु : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

 

मकर : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

मीन : प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Leave a Comment