अहिल्यानगर – राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले असून, या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण काल जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून इच्छुकांना त्यानुसार तयारी करावी लागणार आहे. या जाहीर झालेल्या आरक्षणानुसार, कोणत्या नगरपरिषदेसाठी कोणते आरक्षण जाहीर झाले आहे, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे
नगराध्यक्षपदाचे जाहीर झालेले आरक्षण (अहिल्यानगर)
१. खुला प्रवर्ग -खुला प्रवर्गासाठी जिल्ह्यामध्ये चार नगरपरिषदा आरक्षित झाल्या आहेत. यात देवळाली प्रवरा, श्रीगोंदा, श्रीरामपूर आणि नेवासा यांचा समावेश आहे.
२. ओबीसी (OBC) -ओबीसी प्रवर्गासाठी सहा जागा आरक्षित झाल्या आहेत. यामध्ये अकोले, पारनेर, कोपरगाव, राहता आणि पाथर्डी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कर्जत येथील नगराध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे.
३. महिला (खुला प्रवर्ग) – खुला प्रवर्गातून महिलांसाठी तीन जागा आरक्षित झाल्या आहेत. यात संगमनेर, जामखेड आणि शेवगाव या नगरपरिषदांचा समावेश आहे.
४. अनुसूचित जाती (SC) – महिला -अनुसूचित जाती प्रवर्गातून फक्त महिलांसाठी शिर्डी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद आरक्षित झाले आहे.
५. अनुसूचित जमाती (ST) – अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राहुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद आरक्षित झाले आहे.आरक्षण जाहीर झाल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाची गती आता वाढणार असून, इच्छुक उमेदवार व पक्षांना त्यानुसार पुढील रणनीती आखावी लागणार आहे.
