आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष- कार्यक्षेत्रात आपला प्रभाव टिकून राहील. कलाकारांना प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. बोलण्यातून गैरसमज होऊ शकतो.

वृषभ – आपल्या नोकरीत फायदेशीर बदल करता येतील. मान-सन्मानाचा योग येईल. रागीट आणि हट्टी स्वभावाला मुरड घाला.

मिथुन – आकस्मिक पैसे खर्च होतील. गृहस्थ जीवनात सुख आणि आनंद मिळेल. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करता येईल.

कर्क – अधिक संवेदनशील व्हाल. दिवस आनंदात जाईल. उग्र चर्चा करू नका. आर्थिक मदत मिळेल. कला क्षेत्रात चमकाल.

सिंह – प्रतिष्ठेचा बडेजाव न करता कामे करा. शेजारी मदत करतील. सरकारी कामात यश मिळेल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या – नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आर्थिक कार्यात लाभ मिळेल. पाल्यांसाठी पैसे खर्च होऊ शकतात. नवीन परिचय होतील.

तूळ – महत्त्वाची वस्तू नीट सांभाळा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल.कोर्टाच्या कामात यश मिळेल. आनंददायी पर्यटन होईल.

वृश्चिक – आत्मविश्वासाने काम केल्याने यश मिळेल. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा लाभेल. सहकार्‍यांशी मिळतेजुळते धोरण ठेवा.

धनु – संमिश्र स्वरूपाचे वातावरण राहील. आळस करू नका. सोबत काम करणार्‍यांचे सहकार्य मिळेल. विचारांना चालना मिळेल.

मकर – कुटुंबीय तसेच मित्रांसोबत वेळ घालवाल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. प्रयत्नाने कामे मार्गी लागतील.

कुंभ – तब्येत उत्तम राहील. एखादी उत्साह वाढवणारी घटना घडेल. आपल्या बोलण्यावर आणि वर्तनावर संयम ठेवावा लागेल.

मीन – नव्या कामाचा शुभारंभ करू शकता. आरोग्याच्या तक्रारी सुरू होतील. मोहाला बळी पडू नका. इतरांशी नम्रपणे बोलावे.

Leave a Comment