राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका कधी होणार? याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुकांसंदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात येत्या 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान नगरपरिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर 15 ते 20 डिसेंबरदरम्यान जिल्हा परिषद निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे.
राज्यात महापालिका निवडणूक कधी?
समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात येत्या 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान नगरपरिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे.
तर 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद निवडणुका होऊ शकतात तर महानगरपालिकेच्या निवडणुका या पुढील वर्षात 15 जानेवारीला होण्याची शक्यत आहे. सर्व महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकाच दिवशी मतदान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मुंबई महापालिकेचा देखील समावेश आहे.
