अहिल्यानगर जिल्ह्यातून शेकडो शेतकरी नागपूरात धडकणार, भूमिपुत्र संघटनेचा एल्गार 

पारनेर(DSNews24/किरण पुरी) शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्‍ती आणि शेतीमालाला हमीभाव या मागण्यांच्या पूर्ततेसाठी नागपूर येथे 28 ऑक्‍टोबर रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने सरकारच्या विरोधात महाएल्गार आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने पारनेर येथील शासकीय विश्रामगृहात संस्थापक संतोष वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत राज्यातील विविध शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर येथे होणाऱ्या महाएल्गार आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनातून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या विषयांची मागणी सरकारने केली जाणार आहे. त्यामुळे या आंदोलनातून सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी शेतकरी संघटना भाग पाडणार आहे. त्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून या महाएल्गार आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने या बैठकीत नियोजन केले आहे.

यावेळी संतोष वाडेकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी संभाजीनगर येथे शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, अजित नवले, बच्चू कडू यांच्यासह विविध प्रमुख नेत्यांची शेतकरी कर्जमाफीसंदर्भात बैठक झाली होती. त्या बैठकीत कर्जमाफी संदर्भात सरकारच्या विरोधात २८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे आंदोलन करण्याचा ठरलं होतं. त्या अनुषंगाने या आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटनाही सहभागी होणार आहे. त्यामुळे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नियोजनविषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर येथे होणाऱ्या महाएल्गार आंदोलनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून शेकडो शेतकरी जाणार आहे.

यावेळी या बैठकीला भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, अनिल सोबले, बाळशिराम पायमोडे, राहुल गुंड, मनोज तामखडे, संदिप शिंदे, विक्रम काळे, अरूण बेलकर, जालिंदर लंके, वसंत साठे, विशाल करंजुले, बापू गट, संजय भोर, भास्कर गागरे, संतोष वाबळे, गोरक्ष पठारे, सुभाष करंजुले, पांडुरंग पडवळ उपस्थित होते.

Leave a Comment