जयश्री थोरात यांची तुषार भागवत यांच्या निवासस्थानी भेट, नेमकं कारण काय?

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील जांबुत येथील तुषार भागवत यांच्या निवासस्थानी नुकतेच संगमनेर युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा जयश्री थोरात यांनी भेट दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून थोरात आणि भागवत परिवाराचे आपुलकीचे संबंध आहे. त्यामुळे जयश्री थोरात यांनी कौटुंबिक भेट घेऊन भागवत परिवाराशी संवाद साधला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, ज्येष्ठ नेते विठ्ठल भागवत, सरपंच सोनाली शेटे, तुषार भागवत उपस्थित होते.

दरम्यान स्व. तुकाराम बाबा भागवत यांच्या पासुन समाजकारण व राजकारणात असलेल्या या सक्रिय कुटुंबातून विठ्ठल भागवत यांना तालुक्यात मोठी संधी म्हणून शेतकी संघाचे संचालकाची जबाबदारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. अत्यंत एकनिष्ठेने काम करणारे भागवत कुटुंबाची ओळख आहे. तसेच तुषार भागवत हे एक युवा नेतृत्व म्हणून काम करत आहेत. त्यांचा सर्वत्र दांडगा संपर्क आहे. तसेच तुषार यांची थोरात – तांबे परिवारातील खास मर्जीतील व्यक्ती म्हणून ओळख आहे. तसेच एक अभ्यासू वृत्तीचे तुषार आहे.

भागवत आणि थोरात – तांबे कुटुंबाचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असून एका कार्यक्रमानिमित्त जयश्री थोरात यांनी भागवत परिवराची भेट घेतली. या भेटीत भागवत परिवारातील सदस्यांसोबत जयश्री थोरात यांनी गप्पा मारल्या. तसेच कौटुंबिक विचारपूस केली.

मात्र ही भेट कौटुंबिक वाटत असली तरी राजकीय आडाखे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तुषार भागवत हे तालुक्यात वैचारिक बैठक असलेला प्रकाश झोतात न राहणारा कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. मात्र आता या भेटीमागे जिल्हा परिषदेचे काही संदर्भ तर नाही ना हे पुढील काळात बघावे लागेल

Leave a Comment