बुवाजी खेमनर यांच्या निधनानंतर आ.अमोल खताळ म्हणाले…

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) संगमनेर तालुक्यातील साकूर पठारभागातील भाजपचे नेते बुवाजी पा. खेमनर यांचं अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचं ४९ वय होतं. पुण्यात जहांगिर हॉस्पिटलमध्ये त्यांनी दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच पठार भागावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

बुवाजी पा. खेमनर यांच्या निधनाची बातमी समजताच संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ यांनी एक निष्ठावंत, तळागाळातील कार्यकर्ता गमावला असल्याची भावना व्यक्त केली आहे.

आ. अमोल खताळ म्हणाले की, साकुर पठार भागातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक व कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ बुवाजी खेमनर यांच्या निधनाने पक्षाने एक निष्ठावंत, तळागाळातील कार्यकर्ता गमावला आहे, अशी भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली आहे. संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. त्यांच्या निधनाने साकुर पठार भागातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनःपूर्वक सहवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

Leave a Comment