संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील आंबेडकरनगर येथे नवीन सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने व आमदार अमोल खताळ पाटील यांच्या प्रयत्नाने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत २० लाख रुपयांचा निधी मंजुर झाल्याची माहिती भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी DSNews24 शी बोलताना दिली आहे.
सन २०२२ च्या साकूर ग्रामपंचायत निवडणुकीत आंबेडकरनगरमधील सार्वजनिक शौचालयाच्या दुरावस्थेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यामुळे या भागातील रहिवाशांची गैरसोय लक्षात घेऊन भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी यासाठी निधी देण्याची मागणी आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे केली होती.
त्यानंतर आमदार अमोल खताळ पाटील यांनी यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे पालकमंत्री ना.विखे पाटील यांच्या सहकार्याने पाठपुरावा करत साकूर येथील सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी 20 लाख रुपयांच्या निधीसह संगमनेर तालुक्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. यामध्ये हिवरगाव पठार येथे सांस्कृतिक सभागृह बांधकामासाठी 10 लाख रु च्या निधीचा समावेश आहे.
या मंजुर निधी बद्दल महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यासह नागरिकांनी आमदार अमोल खताळ पाटील व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
