पारनेर(DSNews24 / किरण पुरी) शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा या मागण्यांच्या पूर्ततेसाठी नागपूर येथे 28 ऑक्टोबर रोजी शेतकरी संघटनेचे मा.खा. राजू शेट्टी, अजित नवले, माजी मंत्री बच्चू कडू, माजी मंत्री रविकांत तुपकर, विजय जावंदिया यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेंच्या वतीने सरकारच्या विरोधात महाएल्गार आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेे संस्थापक संतोष वाडेकर यांनी देखील जाहिर पाठिंबा दिला आहे.
नागपूर येथील महाएल्गार आंदोलनात सहभागी होण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून शेकडो भूमिपुत्र वार – सोमवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ५० गाड्यांच्या ताफ्यासह पारनेर तालुक्यातील देसवडे येथून सकाळी ९ वाजता नागपूरकडे रवाना होणार आहेत. विशेषतः या आंदोलनात सहभागी होण्याऱ्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
राज्यातील विविध शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर येथे होणाऱ्या महाएल्गार आंदोलनातून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या विषयांची मागणी सरकारने केली जाणार आहे. त्यामुळे या आंदोलनातून सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी शेतकरी संघटना भाग पाडणार आहे. त्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून देखील असंख्य शेतकरी सहभागी होणार आहेत. त्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी पुढाकार घेत अचूक नियोजन केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी ही आरपारची लढाई होणार आहे.
नागपूर येथे महाएल्गार आंदोलनात सहभागी होण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. जवळपास ५० गाड्यांचा ताफा नागपूरकडे जाणार आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांशी कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी तशी व्यवस्था केली आहे. कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव जोपर्यंत मिळणार तोपर्यंत आम्ही हटणार नाही. या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
संतोष वाडेकर – संस्थापक भूमिपुत्र शेतकरी संघटना
