स्व. बुवाजी खेमनर यांच्या आठवणींने मंत्री विखे पाटील भावूक, म्हणाले माझी “ती” शेवटची भेट ठरली

संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूर पठारभागाची बुलंद तोफ तसेच आक्रमक भाषणशैली, स्पष्टवक्तेपणा म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते स्व. बुवाजी पा. खेमनर ( वय ४९ ) यांच १७ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज स्व. बुवाजी पा. खेमनर यांचा साकूर येथील अमरधाममध्ये हजारोंच्या उपस्थितीत दशक्रिया विधी पार पडला. यावेळी स्व. बुवाजी खेमनर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दरम्यान स्व. बुवाजी खेमनर यांच्या निधनामुळे खेमनर कुटुंबियावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्व. बुवाजी खेमनर यांच्या कुटुंबीयांच सांत्वन करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी खेमनर कुटुंबियांची भेट घेतली.

यावेळी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्व. बुवाजी पा. खेमनर यांच्या फोटोला पुष्पांजली अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर खेमनर कुटुंबियांची आपुलकीने ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारपूस करत धीर दिला. तसेच स्व. बुवाजी खेमनर यांची पत्नी सुनिता, चिरंजीव संकेत, मुलगी कोमल यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारपूस करत त्यांना मायेचा आधार दिला. तसेच यावेळी बुवाजी खेमनर यांच्या निधनामुळे ना. राधाकृष्ण विखे पाटील भावूक झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान मंत्री ना. विखे यांनी स्व. बुवाजी खेमनर यांची मुलगी कोमल हीची पुढील सर्व जबाबदारी घेत पालकत्व स्वीकारले आहे.

यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुवाजीची आणि माझी शेवटची भेट मुंबई येथील रॉयल स्टोन या निवासस्थानी झाल्याची आठवण सांगितली. बुवाजी तापट स्वभावाचा होता. प्रंपचाकडे लक्ष न देता बुवाजी कामात वाहून घेतलं होतं. बुवाजीने कोणत्याही कामात कधीही आळस आणला नाही. तसेच मी बुवाजीवर कधी कधी रागवलो तर कधी त्यांना राग आला नाही. बुवाजीच्या  भाषणाची लकप वेगळीच होती. पठार भागात बाळासाहेब खेमनर व स्व. बुवाजी खेमनर या दोघांची जोडी कायम सोबत होती. बाळासाहेब खेमनर यांच्या तब्येतीची विचारपूस करत ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, बुवाजी मी आजारी आहे मान्यच करत नव्हते. मात्र बुवाजीच्या निधनाने पठार भागात मोठी पोकळी निर्माण झाल्याची खंत मंत्री विखे पाटलांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार अमोल खताळ, शिवसेना प्रवक्ता संजीव भोर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, शौकत जहागीरदार, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, अण्णासाहेब बाचकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. बुवाजी खेमनर मंत्री विखे पाटलांचा एकनिष्ठ कार्यकर्ता

स्व. बुवाजी पा. खेमनर यांचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घराण्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते. तसेच एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून स्व. बुवाजी खेमनर यांची ओळख निर्माण होती. एक धाडसी आणि आक्रमक नेता म्हणून पठार भागात त्यांनी नावलौकिक मिळवला होता. तसेच स्व. बुवाजी खेमनर आमदार अमोल खताळ यांचे देखील अत्यंत जवळचे सहकारी होते. मात्र त्यांच्या निधनामुळे पठार भागात एक पोकळी निर्माण झाली आहे. स्व. बुवाजी खेमनर हे एक नेतेमात्र नाही, तर लोकांच्या मनातील विश्वासाचं प्रतीक हरपलं आहे अशी भावना तमाम जनसामान्य व्यक्त करीत आहेत.

स्व. बुवाजी खेमनर यांनी धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी आपली छाप उमटवली होती. जनतेच्या अडचणी स्वतःच्या म्हणून सोडवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने साकूर पठार भागातील राजकीय वातावरणात शून्यता निर्माण झाली आहे. त्यांचे कार्य, त्यांची भाषणे आणि जनतेवरील प्रेम आता केवळ आठवणीत उरले आहे. मात्र साकूर पठार भागाचा आवाज आज कायमचा थांबला आहे. परंतु स्व बुवाजी पा खेमनर यांनी हजारो जनतेच्या हृदयात आपुलकीच स्थान निर्माण केले म्हणूनच प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंचा बांध फुटत आहे.

Leave a Comment