संगमनेर(DSNews24/किरण पुरी) सध्या जिल्हा परिषदेची निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच जांबुत खुर्द येथील अनिकेत शिवाजी पारधी या युवकाने संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. अनिकेत पारधी यांनी आपला राजीनामा संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात यांच्याकडे पाठविला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राजीनामा पत्रात काय म्हटले?
माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे मी आपला संघटनेला योग्य तो वेळ देऊ शकत नाही. तसेच संगमनेर तालुका सरचिटणीस या पदाला योग्य तो न्याय देण्यासाठी माझ्याकडून शक्य होत नाही. म्हणून मी संगमनेर तालुका सरचिटणीसपदाचा राजीनामा देत आहे. तसेच यापुढे मी पक्षाची व पक्षाच्या विचारधारेशी बांधील राहिन आणि पक्षासाठी माझ्या परिने कार्य करत राहिलं असे अनिकेत पारधी यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
कोण आहे अनिकेत पारधी?
जांबुत खुर्द येथील अनिकेत शिवाजी पारधी येथील रहिवासी आहे. तसेच या युवकाने शालेय जीवनापासून सामाजिक उपक्रमांत हिरारीने सहभाग घेतला. तसेच जागरूक भाषणे केले. अनिकेतने सरपंच सेवा संघाचे साकुर गट प्रतिनिधी म्हणून काम केले. तसेच साकुर गट काँग्रेस सोसियल मिडिया प्रमुख म्हणून काम केले.
अनिकेत पारधी हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. मात्र राजीनामामागच मुख्य कारण समोर आलं नाही परंतु आगामी काळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
