आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

 

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

 

कर्क : रखडलेली कामे दुपारीनंतर मार्गी लागतील. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

 

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कन्या : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

वृश्‍चिक : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

 

धनु : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.

 

मकर : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मीन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Leave a Comment