तौसिफ सय्यद यांचा संगमनेर युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) सध्या जिल्हा परिषदेची निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच जांबुत बुद्रुक येथील तौसिफ जैनुद्दीन सय्यद या युवकाने संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. तौसिफ सय्यद यांनी आपला राजीनामा संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्याकडे पाठविला आहे.

त्यांचा राजीनाम्याचे खरे कारण अजूनपर्यंत अस्पष्ट आहे. तसेच लवकरच माध्यमांसमोर राजीनाम्याची कारणे स्पष्ट करणार असल्याचे तौसिफ सय्यद यांनी सांगितले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या आधी अनिकेत पारधी या युवकाने देखील सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. मात्र तौसिफ सय्यद यांचा राजीनामा साकुर पठारभागातील युवकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

तौसिफ सय्यद यांनी राजीनामा पत्रात काय म्हटले?

मी युवक काँग्रेस संगमनेर तालुका सरचिटणीसपदाचा तात्काळ राजीनामा देत आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे, मी सध्या पक्षाच्या कामांवर पुरेसा वेळ आणि लक्ष देऊ शकत नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत सेवा करणे आणि पक्षाच्या कामात आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये योगदान देणे हा एक सन्मान आहे. माझ्या कारकिर्दीत तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी नेहमीच आभारी राहीन आणि पक्षाच्या मूल्यांचे आणि दृष्टिकोनाचे मी नेहमीच पालन करत राहीन

Leave a Comment