पिंपळगाव देपा गणातून कांतिलाल गिते यांनाच उमेदवारी मिळावी, जोरदार मागणी

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून कोणत्याही क्षणी निवडणूक आयोग निवडणूकांची घोषणा करू शकते. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच सदस्यपदाच आरक्षण सोडत निघाली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रचाराला सुरुवात केलीय. तसेच मतदारांच्या गाठीभेटी देखील सुरू केली आहे. आप आपले पाहुण्यांना संपर्क साधून लक्ष असूद्या असा निरोप देखील इच्छुक उमेदवार देताना दिसत आहेत.

तसेच संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव देपा गणासाठी सर्वसाधारण आरक्षण असून या गणात कौठेमलकापूर येथील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराज गिते पाटील यांचे चिरंजीव कांतीलाल भिमराज गिते पाटील निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांचा जनसंपर्क देखील अत्यंत दांडगा असून त्यांनीच पंचायत समिती सदस्यपदासाठी महायुतीकडून उमेदवारी करावी अशी जोरदार मागणी पिंपळगाव देपा गणातील गावांमधून होताना दिसत आहे.

कांतीलाल गिते यांची राजकीय पार्श्वभूमी काय

कांतीलाल गिते यांचे वडील स्व. भिमराज गिते पाटील यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून ते सदस्य झाले होते. तसेच ते कौठेमलकापूर गावचे सरपंच देखील होते. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते होते. स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील व खताळ पाटील यांच्याशी चांगले घनिष्ठ सबंध होते. ते संबंध आजही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सुजय दादा विखे यांच्यासोबत पण ऋणानुबंध आहे. तसेच संगमनेरचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ यांच्यासोबतही गिते कुटुंबाचे चांगले संबंध आहे. त्यामुळे गिते परिवार व विखे – खताळ परिवाराचा घनिष्ठ संबंध येतो. गिते परिवाराचा तसा राजकीय क्षेत्रात मोठा अनुभव आहे. सन २०१७ साली देखील कांतिलाल गिते यांची चुलती सौ. हिराबाई हरीभाऊ गिते पाटील यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती. मात्र या निवडणुकीत अल्प मताने त्यांचा पराभव झाला होता.

सोसायटीचा भ्रष्टाचारच बाहेर काढला

तसेच कांतीलाल गिते हे कौठेमलकापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक होते. ही सोसायटी जवळपास १५ वर्ष थोरात गटाच्या ताब्यात असताना कांतिलाल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीवर झेंडा फडकवला. तसेच त्यानंतर अचूकपणे कारभार केला. तसेच जवळपास १५ वर्षे थोरात गटाकडे असणाऱ्या सोसायटीतील भ्रष्टाचार कांतिलाल गिते यांनी बाहेर काढला. तसेच या संदर्भात औरंगाबाद खंडपीठापर्यंत दावा दाखल करून तो भ्रष्टाचार बाहेर काढला. त्यामुळे कांतीलाल गिते चांगलेच चर्चेत आले होते.

आजही गिते पाटलांच नाव चर्चेत 

स्वर्गीय भीमराव गीते पाटील यांना साकुर पठारभागामध्ये मानणारा प्रत्येक समाजामध्ये खूप मोठा एक गट आहे. त्यांनी सर्व धर्म समभाव राखत राजकारण केले. तसेच साकूर जिल्हा परिषद गटातील डोळासणे, कर्जुलेपठार, गुंजाळवाडी पठार, धुमाळवाडी, मोधळवाडी, खंडेरायवाडी, पिंपळगाव देवा, खांबे, कुंभारवाडी, दरेवाडी, वरवंडी, चौधरवाडी, खरशिंदे, कणसेवाडी या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गिते पाटलांचे नातेसंबंध आहेत. या भागामध्ये स्वर्गीय भिमराज विठोबा गीते पाटील यांच खूप मोठ्या प्रमाणात मोलाचं सहकार्य राहील आहे. त्यामुळे आजही प्रत्येक गावात प्रत्येक घरामध्ये गीते पाटलांचं नाव घेतलं जातं.

जनतेत चर्चा काय? 

गिते परिवाराला मोठा राजकीय वारसा आहे. कारण गिते पाटलांनी पठार भागात मोठ कार्य केले आहे. कांतिलाल गितेपाटील यांचे आजोबा, वडिलांनी जनतेसाठी खुप काही केले आहे. कांतीलाल गिते पंचायत समितीच्या माध्यमातून योग्य काम करू शकतात. तसेच ते सुशिक्षीत देखील आहे. जनतेच्या समस्यांची जाणीव असलेले नेतृत्व असून पिंपळगाव देपा गणासाठी महायुतीकडून कांतीलाल गिते यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी जनतेसह प्रतिष्ठित व्यक्तींकडून करण्यात येत आहे.

पिंपळगाव देपा गणात कोणती गावे 

पिंपळगाव देपा गणात वरवंडी, मांडवे बुद्रुक, खांबे, डोळासणे, शिंदोडी, कर्जुले पठार, खरशिंदे, रणखांबवाडी, कौठेमलकापूर, दरेवाडी या गावांचा समावेश आहे

Leave a Comment