मिशन ZP : साकूर ‘झेडपी’साठी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर यांनी थोपटले दंड, तिसऱ्यांदा निवडणूकीत… वाचा किरण पुरींचा स्पेशल रिपोर्ट…

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) नुकतेच पहिल्या टप्प्यातील नगरपालिका व नगरपरिषदेंच्या निवडणूकांचे बिगुल वाजले असून यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणूका होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. तसेच ज्या त्या प्रभाग, गट व गणात इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून प्रचाराला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गुप्त गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तसेच राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा तसेच सर्वांचेच संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटाकडे लक्ष लागले आहे. कारण या गटावर कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत कॉंग्रेसचाच दबदबा आहे. जवळपास दोन दशकांपासून साकूर जिल्हा परिषद गटात कॉंग्रसचाच उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे साकूर गट हा आजही कॉंग्रेससाठी अनूकूल आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर परिस्थिती काहिशी बदलली आहे. त्यामुळे साकूर जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा बनला असून या गटातील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

साकूर जिल्हा परिषद गटासाठी “सर्वसाधारण” आरक्षण निघाल्याने काँग्रेस व भाजपसह विविध पक्षाच्या इच्छुकांची चाचपणी सुरू झाली. तसेच महाविकास आघाडी व महायुतीकडून कोण कोण उमेदवार असणार तसेच वरीष्ठ कोणाला संधी देणार याचीच जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच संगमनेर तालुक्याच्या दृष्टीने साकूर जिल्हा परिषद गट हा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळे विखे आणि थोरात कार्यकर्त्यांची सरळसरळ लढत असून दोन्हींकडूनही विविध नावांची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मात्र साकूर गटातून दोनदा निवडणूक लढविणारे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. बाळासाहेब खेमनर यांनी पुन्हा निवडणूक लढवावी अशी इच्छा नागरिकांसह जाणकार व्यक्तींनी केलीय.

साकूर गटातून दोनदा लढविली निवडणूक 

मात्र सन २००२, २०१२ साली कॉंग्रेसच्या विरोधात निवडणूक लढविणारे अहिल्यानगरचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एकनिष्ठ कार्यकर्ते व भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांनी पुन्हा तिसऱ्यांदा साकूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे महायुतीकडून पुन्हा तिसऱ्यांदा त्यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. तसेच बाळासाहेब खेमनर यांनी ही शेवटची निवडणूक लढवावी अशी पठार भागातील नागरिक व जाणकारांची इच्छा आहे. कारण साकूर पठार भागातील एक शांत, संयमी, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे तसेच सर्व धर्म सम भाव राखत राजकारण करणारे अनोख व्यक्तीमत्व अशी बाळासाहेब खेमनर यांची ओळख निर्माण झाली. तसेच त्यांचा मोठा प्रलय व प्राबल्य पठार भागात उभे राहिले आहे.

भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब खेमनर

बाळासाहेब खेमनर हे पठार भागातील भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहे. पठारभागात खरी भाजप टिकविण्यासाठी जीवाचे रान त्यांनी केलं. पठार भागात कॉंग्रेसच्या विरोधात काम करून विरोधक काय असतो हे त्यांनी दाखवून दिले. बाळासाहेब खेमनर यांच्यामुळेच आज भाजपला सुगीचे दिवस आले आहेत. त्यांनी कधीच तत्वांशी तडजोड केली नाही. पक्ष देखील त्यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही. कारण एकनिष्ठ कार्यकर्ता काय असतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.

तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवारांपुढे झुकले नाही

भाजपचे नेते बाळासाहेब खेमनर यांनी पहिली निवडणूक २००२ साली भाजपकडून लढवली होती. त्यावेळी त्यांनी स्व. अशोकराव बाजीराव पा. खेमनर यांना जोरदार टक्कर दिली होती. त्यावेळी महाभारतातील एका अभिमन्यू प्रमाणे बाळासाहेब खेमनर यांनी मैदान सोडले नाही. या निवडणुकीत बाळासाहेब खेमनर यांचा काही मतांनी पराभव झाला होता. मात्र विरोधक म्हणून बाळासाहेब खेमनर यांनी कॉंग्रेसला अक्षरशः घाम फोडला होता. त्यानंतर पुन्हा २०१२ साली बाळासाहेब खेमनर हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. राष्ट्रवादीकडुन उमेदवारी करत बाळासाहेब खेमनर यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे काॅंग्रेसच्या सत्यजीत तांबेंना जोरदार टक्कर दिली होती. यामध्ये समोर विद्यमान विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे हे बलाढ्य उमेदवार असतानाही सर्वसामान्य उमेदवार असणारे बाळासाहेब खेमनर यांनी चांगली मते मिळवली होती. मात्र या निवडणुकीत फार कमी मतांच्या फरकाने बाळासाहेब खेमनर यांचा पराभव झाला होता.

पठार भागात बाळासाहेब खेमनर यांचं नाव चर्चेत 

बाळासाहेब कोंडाजी खेमनर यांची पठारभागात एक वेगळीच ओळख आहे. सर्वांच्या सुख दुःखात कायम सहभागी होत असतात. त्यांच्याकडे एक दुरदृष्टी ठेवणारा नेता म्हणून बघितले जाते. तसेच त्यांचा मोठा गोतावळा गटात आहे.

बाळासाहेब खेमनर यांनी शेवटची निवडणूक लढवावी

गेली अनेक वर्षे पठार भागातील कॉंग्रेसच्या विरोधात काम करून विरोधक काय असतो हे त्यांनी दाखवून दिले. तसेच दोन वेळा जिल्हा परिषद निवडणुक देखील लढवली आहे. पक्षासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्याब बाळासाहेब खेमनर यांनी ही शेवटची निवडणूक लढवावी अशी जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तसेच अनुकूल वातावरण देखील असल्याचे काहिंचे म्हणने आहे.

विखे पाटील घराण्यांशी जिव्हाळ्याचे संबंध 

बाळासाहेब खेमनर यांचे विखे पाटील परिवाराशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहे. त्यामुळे बाळासाहेब खेमनर यांच शब्द ते कधीही मोडू शकत नाही असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ऐनवेळी साकूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बाळासाहेब खेमनर यांच्या नावाचा विचार करू शकतात अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे बाळासाहेब खेमनर पुन्हा तिसऱ्यांदा साकूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे.

Leave a Comment