आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

 

मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.

 

कर्क : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

 

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

वृश्‍चिक : इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.

 

मकर : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. संततिसौख्य लाभेल.

 

कुंभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Leave a Comment