गुलाब भोसले आक्रमक म्हणाले, श्रेय घेण्यासाठी तांबे हळूच मध्ये शिरतात आणि….

संगमनेर(DSNews24 ) तालुक्यातील विकासकामांना निधी मिळवण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत १५ कामांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, या कामाचं श्रेय घेण्यासाठी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या खोटेपणाची पोलखोल भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले यांनी केली आहे.

भोसले म्हणाले की, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जो निधी मंजूर झाला तो आमदार खताळ यांच्या पत्रांवर आणि पाठपुराव्यामुळे, मंजूर झाला आहे. परंतु त्याचे श्रेय घेण्यासाठी तांबे हळूच मध्ये शिरतात आणि जनतेची दिशाभूल करतात हा प्रकार म्हणजे राजकारण नव्हे तर स्वतःसाठी प्रसिद्धीची भिक मागण्यासारखा आहे.

संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ हे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी तालुक्याचा सविस्तरपणे आढावा घेत विविध ५० कामांसाठी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार यापुर्वी १० कामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आता पुन्हा ७६ लाख रुपये निधीच्या १५ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भात ६ मे २०२५ रोजी आमदार खताळ यांनी मंत्री अतुल सावे यांच्याकडे पत्रव्यवहार केला असल्याचे भोसले यांनी सांगितली. या कामाशिवाय इतर अनेक विकास कामे आणि निधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न पाठीमागील काही महिन्यांपासून तांबे यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप भोसले यांनी केला.

यावेळी आमदार खताळ यांनी मागणी केलेल्या विकास कामांचे पत्र आणि पुरावे भोसले यांनी दाखवले. संगमनेरच्या प्रत्येक विकास कामावर लक्ष ठेवून ‘कुठे श्रेय मिळेल’ याचीच वाट ते बघतात. निधी आल्यावर लगेच पत्र देऊन ‘मीच केलं’ असे सांगत आहेत पण जर त्यांच्या पत्रांमुळेच निधी मिळत असता, तर गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये संगमनेर तालुक्यात प्रलंबित कामं उरलीच नसती., “दिशा भूल करणारे पत्र दाखवून आणि श्रेय घेऊनच तांबे यांचे राजकारण सुरू आहे. जनतेला हे चांगलंच माहीत आहे म्हणूनच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव जनतेनं केला. पदवीधर आमदारांनी आपला नाशिक मतदारसंघ सांभाळावा, अन्यथा सुशिक्षित आणि हुशार मतदार त्यांना घरी बसवतील.” अशी टीका भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले यांनी केली आहे.

श्रेय लाटणार्‍यांनी खुलासा करावा

पदवीधर आमदार तांबे यांना यापुर्वी वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना माहीत तरी होती का? सत्यजित तांबे आणि माजी आमदार सुधीर तांबे यांनी या योजनेंतर्गत संगमनेरमध्ये आजपर्यंत किती निधी आणला हे एकदा जनतेसमोर जाहीर करावे. पदवीधर आमदाराला असा निधी मंजूर करून आणता येतो का? याचा खुलासा श्रेय लाटणार्‍यांनी करावा असा सवाल भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले यांनी केले.

तांबेरूपी साकूरच्या जनतेने राजकुमार पाहिला

ग्रामीण भागाबद्दल कळवला दाखवणारे तांबे साकुर जिल्हा परिषद गटाचे सदस्य असताना साकुर गटात कधी फिरकले सुद्धा नाहीत. त्यांना आता साकुर गटाचा पुळका येऊ लागला आहे. राजकीय हेतू साध्य झाला की सर्वसामान्य जनतेला विसरणारे तांबे रुपी राजकुमार साकुरच्या जनतेने पाहिले आहेत. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुक्यात दुसर्‍याने केलेल्या कामांचे श्रेय घेण्याची धडपड सुरू असल्याची टीका भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले यांनी केली.

Leave a Comment