साकूर ZP : DSNews24 च्या एक्झिट पोलमध्ये कोण ठरल सरस, गुलाब भोसले की बाळासाहेब सागर 

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा तसेच सर्वांचेच संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटाकडे लक्ष लागले आहे. या गटाचे “सर्वसाधारण” आरक्षण निघाल्याने हा गट राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा बनला आहे. तसेच या गटात जिल्हा परिषदेसाठी विखे आणि थोरात कार्यकर्त्यांची सरळसरळ लढत असून दोन्हींकडूनही विविध नावांची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

नुकतेच नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणूका जाहीर झाले आहे. २ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच काही दिवसांतच जिल्हा परिषद, पंचायत समितींची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे साकूर जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडी व महायुतीकडून कोण उमेदवार असणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.

गुलाब भोसले विरूद्ध बाळासाहेब सागर 

मात्र संभाव्य उमेदवार म्हणून महायुतीकडून गुलाब पांडुरंग भोसले व महाविकास आघाडीकडून बाळासाहेब भाऊसाहेब सागर हे उमेदवार असणार असल्याची सध्या मोठी चर्चा आहे. दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे असून दोघांचंही साकूर गटात चांगला संपर्क आहे. अद्याप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी संभाव्य उमेदवार बाळासाहेब सागर विरूद्ध गुलाब भोसले अशीच लढत साकूर झेडपीत बघायला मिळणार असल्याची चर्चा आहे.

एक्झिट पोलनूसार ५० – ५० टक्के लोक दोघांच्या बाजूने 

जर बाळासाहेब सागर विरूद्ध गुलाब भोसले अशी लढत शक्यतो झाली तर निवडणूकीत काय परिणाम राहिल याबाबत गेल्या चार महिन्यांपूर्वीच DSNews24 ने एक्झिट पोल केला होता. या एक्झिट पोलमध्ये जवळपास ४ हजार जनतेने आपलं मत नोंदवल होत. जर बाळासाहेब सागर विरूद्ध गुलाब भोसले अशी लढत झाली तर ५० – ५० टक्के अशी परिस्थिती राहू शकते असं या एक्झिट पोलनूसार दिसून आलं होतं. म्हणजेच गुलाब भोसले यांच्या बाजूने ५० टक्के व बाळासाहेब सागर यांच्या बाजूने देखील ५० टक्के लोकांनी मत नोंदवलं होतं. मात्र तो फक्त एक अंदाज होता परंतु प्रत्यक्षात जेव्हा मतदार कोणाला कौल देणार हे वेळेलाच समजणार आहे.

Leave a Comment