संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील जिजाबाई भाऊसाहेब सागर यांनी जुलै महिन्यात आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने सरपंचपद तब्बल चार महिने रिक्त होत. या रिक्त पदासाठी निवडणूक प्रक्रिया वार – बुधवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेच्या कालावधीत ग्रामपंचायत कार्यालयात पार पडणार आहे. तसेच या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळाधिकारी विश्वजीत चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सागर रसाळ असणार आहे. त्यामुळे बिरेवाडीचा पुढचा सरपंच कोण होणार हे बुधवारी स्पष्ट होणार आहे.
अशी असेल निवडणूक प्रक्रिया
नामनिर्देश पत्र स्वीकारणे – सकाळी ११ ते १२ वा. पर्यंत
नामनिर्देशन पत्राची छाननी वेळ – दुपारी १२ ते १२.३०
नामनिर्देशन पत्र माघारी वेळ – दुपारी १२.३० ते १ वाजेपर्यंत
सरपंच पदाच्या निवडणुकीची वेळ – दुपारी २ वाजता
ग्रामपंचायतीवर कुणाचा झेंडा
बिरेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत शेतकरी गट म्हणजेच कॉंग्रेसने ९ पैकी ६ जागांवर बाजी मारत ग्रामपंचायतीवर झेंडा फडकाविला होता. तसेच सरपंच पदाचे आरक्षण महिला होते. मात्र सरपंच पदासाठी शेतकरी विकास गटाच्या (कॉंग्रेस) विचारानूसार सरपंचपदासाठी एक, दीड तसेच अडीच वर्षं असा कालावधी वाटून घेण्यात आला होता.
पहिल्या एक वर्षांसाठी निलम पांडुरंग ढेंबरे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर एक वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर निलम ढेंबरे यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दीड वर्षांच्या कार्यकाळासाठी जिजाबाई भाऊसाहेब सागर यांची सरपंचपदासाठी निवड करण्यात आली होती. मात्र त्यांचाही कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. तसेच उर्वरित कालावधीसाठी शितल ढेंबरे यांची सरपंचपदासाठी वर्णी लागणार आहे.
कॉंग्रेसचे विद्यमान सदस्य कोण?
निलम ढेंबरे, आण्णा कढणे, तुळशीराम गळंगे, जिजाबाई सागर, पोपट नान्नर, शितल ढेंबरे
महायुतीचे विद्यमान सदस्य कोण?
स्वाती भोसले, शारदा सागर, पंढरीनाथ ढेंबरे
