मिशन साकूर ZP : ठाकरे गटाकडून जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणासाठी “ही” नावे चर्चेत 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांची निवडणूक आयोग घोषणा करू शकते. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच सदस्यपदाच आरक्षण सोडत निघाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून ज्या त्या गटात गणात प्रचाराला सुरुवात केलीय. तसेच मतदारांच्या व होम टू होम गाठीभेटी देखील सुरू केल्या आहे. तसेच संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. तसेच साकूर गणासाठी ओबीसी महिला व पिंपळगाव देपा गणासाठी सर्वसाधारण आरक्षण असून या ठिकाणी देखील पंचायत समिती सदस्यपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

ठाकरे गटाकडून कोण आहे इच्छुक….

गट व गणासाठी कॉंग्रेस, भाजपकडून अनेक नावं समोर आलीय. त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची नावे समोर आलीय. साकूर जिल्हा परिषदेसाठी बाळासाहेब शांताराम बिडगर यांच नाव चर्चेत आलय. तसेच साकूर गणासाठी ओबीसी महिला आरक्षण लागल्याने या गणातून ईश्वरी एकनाथ खेमनर यांचं नाव चर्चेत आलय. तसेच पिंपळगाव देपा गणातून सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने या गणातून एकनाथ बळवंता खेमनर यांचं नाव चर्चेत असून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचही समोर आलंय.

साकूर जिल्हा परिषद गट कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो मात्र यात महाविकास आघाडीत कॉंग्रेससोबत असलेल्या उबाठा पक्षानेही जिल्हा परिषद निवडणुकीत उडी घेतल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे साकूर जिल्हा परिषद गटातील निवडणूकीला आगामी काळात चांगलाच रंग भरणार आहे.

Leave a Comment