साकूर ZP ब्रेकिंग : साकूर झेडपीसाठी “या” बड्या नेत्याच नाव चर्चेत… राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांची निवडणूक आयोग घोषणा करू शकते. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच सदस्यपदाच आरक्षण सोडत निघाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून ज्या – त्या गट, गणात प्रचाराला सुरुवात केलीय. तसेच मतदारांच्या व होम टू होम गाठीभेटी देखील सुरू केल्या आहे. तसेच संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून बाळासाहेब भाऊसाहेब सागर व महायुतीकडून गुलाब पांडुरंग भोसले अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे. तसा प्रचारही दोन्ही बाजूने केला जात आहे.‌

तसेच साकूर जिल्हा परिषद गटावर २००२ ते २०१७ पर्यंत सलग चार वेळा कॉंग्रेसने झेंडा फडकवला आहे. २०१२ साली या गटातून विद्यमान आमदार सत्यजित तांबे देखील जिल्हा परिषद सदस्य झाले होते. त्यामुळे या गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे. तसेच इच्छुक उमेदवारांची अनेक नावे समोर आली आहे. मात्र खरी लढत कॉंग्रेस विरूद्ध भाजप म्हणजेच थोरात विरूद्ध विखे अशी होणार आहे.

या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. बोटा गट आरक्षित झाल्याने त्या गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर यांचे नाव थेट साकूर जिल्हा परिषद गटात चर्चेत आलं आहे. तसेच जनार्दन आहेर हे स्वतः ही साकूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचही सुत्रांकडून माहिती समोर आली. त्यामुळे या गटात ऐनवेळी मोठा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो.

कोण आहे जनार्दन आहेर….

जनार्दन आहेर हे एक मोठं व्यक्तीमत्व आहे. तसेच त्यांच राजकीय क्षेत्रात मोठ नाव आहे. त्यांनी बोटा जिल्हा परिषद गटातून २००७ साली निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर २०१२ साली जनार्दन आहेर यांच्या पत्नी सौ. ललिता आहेर यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत देखील त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. म्हणजेच जवळपास १० वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य आहेर कुटुंबाकडे होत. त्यामुळे जनार्दन आहेर यांचा मोठा अनुभव आहे.

Leave a Comment