आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

वृषभ : महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. शत्रुपिडा नाही.

 

मिथुन : मन आनंदी व आशावादी राहील. आर्थिक लाभ होतील.

 

कर्क : नवीन हितसंबंध निर्माण होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

 

कन्या : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

 

तुळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

धनु : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

मकर : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. जिद्दीने कार्यरत रहाल.

 

कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

 

मीन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Leave a Comment