मोठी बातमी! बिहार विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल, कुणाची येणार सत्ता?

बिहार विधानसभा निवडणुककडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. एक्झिट पोलमध्ये कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

बिहारमध्ये पुन्हा एकदा दोन एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्झिटपोलचे कल पाहिले असता एनडीएला 133-159 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर मॅट्रिक्सने 147-167 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

बिहार विधानसभेच्या 242 जागांसाठी मंगळवारी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 67.14 टक्के मतदान झाले. पोल ऑफ पोल्सच्या एक्झिट पोलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की एनडीए 138 ते 155 जागा जिंकू शकते, तर महाआघाडीला 82 ते 98 जागा मिळू शकतात.

शिवाय, जनसुरज आपले खाते उघडू शकते, परंतु त्यांना दोनपेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज नाही. इतरांना तीन ते सात जागा मिळू शकतात. प्रशांत किशोर यांनी अनेक दावे केले होते. जनसुराज पक्षाबाबत प्रशांत किशोर यांचे दावे मतांमध्ये रूपांतरित होताना दिसले नाहीत. निवडणुकीत प्रशातं किशोर यांना जबरदस्त झटका बसला आहे.

Bihar Election JVC’s exit poll

NDA: 135-150

महागठबंधन: 88-103

जनसुराज पार्टी: 0-1

अन्य: 3-6

 

Bihar Election Dainik Bhaskar exit poll

एनडीए: 145-160

महागठबंधन: 73-91

जनसुराज पार्टी: 0-0

अन्य: 5-10

 

Bihar Election People’s Insight exit poll

एनडीए: 133-148

महागठबंधन: 87-102

जनसुराज पार्टी: 0-2

अन्य: 3-6

 

Bihar Election Matrize exit poll

एनडीए: 147-167

महागठबंधन: 70-80

जनसुराज पार्टी: 0-2

अन्य: 2-8

Leave a Comment