साकूर पठार भागातील उपसा सिंचन सर्वेक्षणाचा ना. विखे पाटलांच्या हस्ते शुक्रवारी शुभारंभ – गुलाबराजे भोसले 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील साकूर पठारभागाचा प्रलंबित असलेला पाणी प्रश्न आता जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून सुटणार आहे. कारण साकूर पठार भागातील सहा उपसा सिंचन योजना जलसंपदा विभागास हस्तांतरित करून एकत्रित उपसा सिंचन योजनेच्या व कोल्हापूर बंधारे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या कामाचा सर्वेक्षण शुभारंभ होणार आहे. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते वार – शुक्रवार दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता साकूर येथे होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांची उपस्थिती राहणार असून या शुभारंभासाठी पठार भागातील शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले यांनी केले आहे.

दरम्यान यावेळी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साकूर, जांबुत, मांडवे केटिवेअर तसेच बिरेवाडी व मांडवे बुद्रुक येथील झिरपी तळ्याची पाहणी करणार आहे. त्यानंतर साकूर येथील आशिर्वाद मंगलकार्यातील हॉलमध्ये उपसा सिंचन प्रकल्पाची माहिती देण्यात येणार आहे.

मा. खा. डॉ. सुजय विखेंनी शब्द पाळला 

साकूर पठार भागात दरवर्षी उन्हाळ्यात मोठी पाणी टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभे राहत आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची देखील मोठी टंचाई पठार भागात भासवत असते. ही परिस्थिती बघता मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न सोडविणार असल्याचा शब्द पठार भागातील जनतेला दिला होता. त्यानंतर जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी याकडे लक्ष देत जलसंपदा विभागाची मंत्रालयात जुनमध्ये बैठक घेऊन याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. यासाठी आमदार अमोल खताळ यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यानंतर पठार भागातील सहा बॅरेज बंधाऱ्यांला मंजुरी मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासून साकूर पठार भागातील प्रलंबित असलेला पाणी प्रश्न आता विखे पाटलांच्या माध्यमातून सुटणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बोले तैसा चाले त्याची वंदवी पाऊले या उक्तीप्रमाणे डॉ. सुजय विखे पाटील यांनी शब्द पाळल्याने त्यांच पठार भागातून अभिनंदन करण्यात येत आहे.

पठार भागाच्या पाणी प्रश्नासाठी ना. विखेंसोबत मंत्रालयात बैठक 

दरम्यान साकूर पठार भागातील दिर्घकाळ प्रलंबित पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी १० जुन २०२५ रोजी मुंबई येथे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या मंत्रालयातील दालनात विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीत जल संपदा विभागाने सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी बॅरेज बंधाऱ्यांचा पर्याय समोर आणला होता. तरच साकूर पठारभागाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागू शकतो अशी चर्चा त्यावेळी झाली होती.

बैठकीला कोण होते उपस्थित 

या बैठकीला आमदार अमोल खताळ, भाजपा तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, खांबे गावचे सरपंच रवींद्र दातीर, ॲड. अमित धुळगंड यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते.

आमदार अमोल खताळ यांनी धरला आग्रह

यावेळी साकुर पठार भागासह तालुक्यातील पाणी प्रश्न कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडवायचा असल्याने आमदार अमोल खताळ यांनी यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यानंतर साकुर पठार भागतील दुष्काळी भागाचे नव्याने सर्वेक्षण करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री ना राधाकृष्ण विखे यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर अखेर साकूर पठार भागातील एकत्रित उपसा सिंचन योजनेच्या व कोल्हापूर बंधारे बॅरेज बंधाऱ्यांला मंजुरी मिळाली असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.

Leave a Comment