दुष्काळाचे संकट पाहिलेल्या साकूर पठार भागात नवे पर्व – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

संगमनेर(DSNews24) उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून साकूर पठार भागातील १४ गावातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचा निर्णय महायूती सरकारने घेतला आहे. सर्वेक्षणाबरोबरच योजनेच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून, वर्षानुवर्ष दुष्काळाचे संकट पाहीलेल्या साकूर पठार भागात नवे पर्व निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागातील १४ गावांकरीता असलेल्या सहाउपसा सिंचन योजनेचे हस्तांतरण जलसंधारण विभागाकडून जलसंपदा विभागाकडे करण्यात आले. योजनांच्या कामासाठी जलसंपदा विभागाने सर्व्हेक्षणाचा निर्णय घेतला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भागाची अधिकार्याच्या समवेत पाहाणी केली.

यावेळी आमदार अमोल खताळ पाटील, जलसंपदा विभाग अहिल्यानगर जिल्हा अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, नाशिक लघुपाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता गणेश हारदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी गायसमुद्रे, भाजप ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, भाजप तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, हरिभाऊ गीते, बाबाजी सागर, श्रीकांत गोमासे शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे, महिला तालुकाध्यक्ष संगीता बांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर, सुभाष पेंडभाजे, आरपीआय तालुका अध्यक्ष आशिष शेळके, शौकत जागीरदार, किशोर खेमनर, अमित धुळगंड, किशोर डोके, रणजीत ढेरंगे, रवींद्र दातीर, मन्सूर पटेल इसाक पटेल, मन्सूर शेख, रोहिणी राऊत, अमृता कोळपकर, भागवत कुदनर, नवनाथ ढेंबरे, दिनकर गुळवे, व पोपट मनसुख, बाबासाहेब गुळवे, किरण गुळवे यांच्यासह साकुर पठार भागातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेतकऱ्यांशी संवाद सातारा मंत्री विखे पाटील म्हणाले की ,वर्षानुवर्ष या भागाला पाणी मिळाले नाही मात्र आमदार.अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत झाली आहे. सहा गावांच्या उपसा सिंचन योजने बरोबर अन्य आठ गावांचा समावेश या मध्ये करण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प महायुती सरकारने केला आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीपुर्वी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करण्याचे काम ऐतिहसिक निर्णयामुळे झाल्याचे मोठे समाधान विखे पाटील यांनी व्यक्त केले.

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यामातून जिल्ह्यातील धरणामध्ये अधिकचे पाणी आणण्यासाठी जलसंपदा विभागाचे काम सुरू झाले आहे, मुळा धरणात १५ टिएमसी पाणी अधिकचे निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुती सरकारने नेहमीच शेतकर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेत असून अतिवृष्टीची मदत म्हणून ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने घोषित केले.तालुक्यातील युवकांच्या रोजगारासाठी औद्यगिक वसहाती करीता आ.खताळ यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना माझे संपूर्ण सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

आ.अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात एक वर्षापुर्वी दिलेल्या शब्दाची पूर्तता होत आहे.नागपूरच्या अधिवेशनात याचे आश्वासन दिले होते.त्याची पुर्तता होत असल्याचा आनंद असून ,महायुती सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत आहे परंतू श्रेय दुसरेच लोक घेण्याच्या प्रयत्नावर त्यांनी टिका केली.औद्यगिक वसाहत साकूर भागातच होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ.खताळ म्हणाले. याप्रसंगी भाजपा अध्यक्ष गुलाबराजे भोसले अल्पसंख्याक मोर्चाचे रऊफ शेख यांची भाषण झाली.

Leave a Comment