पिंपळगाव देपा गणासाठी कॉंग्रेसकडून ॲड. सुभाष गोडसे यांच्या नावाची चर्चा…वाचा किरण पुरींचा रिपोर्ट

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांची निवडणूक आयोग घोषणा करू शकते. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच सदस्यपदाच आरक्षण सोडत निघाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून ज्या त्या गटात गणात प्रचाराला सुरुवात केलीय. तसेच मतदारांच्या व होम टू होम गाठीभेटी देखील सुरू केल्या आहे. तसेच संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव देपा गणासाठी सर्वसाधारण आरक्षण निघाले आहे. त्यामुळे या गणातून अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. या गणातून महाविकास आघाडी व महायुतीकडून कोण उमेदवार असणार हे अद्याप निश्चित झाले नसले तरी काही इच्छूक उमेदवारांची नावे चर्चेत यायला सुरुवात झाली आहे. महायुतीकडून काही नावांची चर्चा समोर आल्यानंतर कॉंग्रेसकडून कोण उमेदवार असणार अशी चर्चा रंगली आहे. यात संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कर्जुले पठार येथील ॲड. सुभाषचंद्र सावळेराम गोडसे (मुन्ना) यांचं नाव चर्चेत आलं आहे. तसेच त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी पिंपळगाव गणातून होत आहे.

ॲड. सुभाषचंद्र गोडसे यांची राजकीय पार्श्वभूमी काय?

कर्जुले पठार येथील ॲड. सुभाषचंद्र गोडसे रहिवासी असून ते नामांकित वकिल आहे. घरातुन त्यांना कोणताही राजकीय वारसा नसतानाही ते राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी सन २००७ – ०८ पासून राजकीय कारकीर्द सुरू केली. तसेच ते जयहिंद युवा मंचचे शाखाध्यक्ष होते. तसेच सुभाष गोडसे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व संगमनेर तालुका कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. तसेच ते पठार भागातील बोटा व साकूर गटाचे प्रभारी म्हणून १० वर्षांपासून कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांनी पठार भागाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीसपदावर काम केले आहे.

शांत, संयमी, उच्चशिक्षित आणि सामाजिक जान असलेलं नेतृत्व 

सुभाष गोडसे हे स्वतः वकिल असल्याने त्यांना सर्व क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. याबरोबरच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्राची आवड असल्याने यामध्ये त्यांनी मोलाच कार्य केले आहे. तसेच त्यांनी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करत सामाजिक उपक्रम राबविले. त्यामाध्यमातून हजारो तरूण वर्ग जोडला गेला. मोठा जनसंपर्क तयार झाला. तसेच अडचणी कोणत्याही असो कायम जनतेच्या संपर्कात राहून अर्ध्या रात्री देखील हक्काने आवाज दिला तर मदतीला सुभाष गोडसे धावून जातात. परिसरात विविध गावांमधील सर्व अबालवरुद्धासाठी मदतीला धावून जाणे हिच त्यांची खरी ओळख आहे. तसेच त्यांनी वकिली व व्यवसायच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना कायमच मदत केली.

वडिलांचे संस्कार ठरले समाजउपयोगी 

ॲड. सुभाष गोडसे यांचे वडिल स्वतः शैक्षणिक क्षेत्रात जोडले गेले होते. वडिलांनी हजारो मुल घडविले. त्यांचा स्वभावही सुसंस्कृत व मनमिळावू असल्याने एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. नांदूर खंदरमाळ येथे माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले. म्हणूनच वडिलांचे संस्कार ॲड. सुभाष गोडसे यांच्यासाठी समाज उपयोगी ठरत आहे.

कोरोना काळात ठरले देवदूत ; माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सुनिल आण्णा शेळकेंनी थोपटली पाठ

देशात जेव्हा महा भयंकर कोरोनाने थैमान घातले होते. तेव्हा सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते. कोरोना काळात ॲड. सुभाष गोडसे यांनी एकही दिवस घरी न बसता जनतेला मदत करण्याच काम केले. त्या काळात दोन महिने अण्णछत्र चालवले. याची कुठलीही प्रसिद्धी न करता ते दूर राहिले. अगदी कोरोनाच्या रूग्णाला सुभाष गोडसे यांनी स्वतः रूग्णवाहिका चालवून पुणे, नाशिक व पारनेर या ठिकाणी उपचारासाठी पोहच केले. त्यामुळे ॲड. सुभाष गोडसे यांचे नाव कोरोना योद्धा म्हणून चर्चेत आलं होतं. त्याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सुनील आण्णा शेळके यांनी सुभाष गोडसे यांचा सत्कार करत पाठ थोपटली होती.

ॲड. सुभाष गोडसे यांना उमेदवारी मिळावी

पिंपळगाव देपा गणातून कॉंग्रेसकडून ॲड. सुभाष गोडसे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कारण सुभाष गोडसे सर्व बाजूने कणखर व अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. कोणताही विषय ते सहजरित्या हातळू शकतात. त्यांना प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. स्वतः वकिल असून ते सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सक्षम असल्याने कॉंग्रेसकडून त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी पिंपळगाव देपा गणातून होताना दिसत आहे.

Leave a Comment