साकूर गटावर कॉंग्रेसची भक्कम पकड ; बाळासाहेब सागर यांची ताकद वाढतेय…

संगमनेर (DSNews24/किरण पुरी) गेल्या दोन दशकांपासून म्हणजेच सन २००२ ते २०१७ पर्यंत संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाचाच सलग चार वेळा झेंडा फडकला आहे. त्यामुळे साकूर गट हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता सलग पाचव्यांदा साकूर गटावर झेंडा फडकविण्यासाठी कॉंग्रेस सज्ज झाली आहे. त्यामुळे या गटातील निवडणूकीकडे संपूर्ण जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी परिवर्तनाची लाट असताना देखील साकूर गटातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना १३०० मतांच लीड दिले होते. त्यामुळे साकूर गटावर कॉंग्रेसची भक्कम पकड असल्याची चर्चा संपुर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू आहे. काही दिवसांतच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे साकूर गटावर सलग पाचव्यांदा झेंडा फडकविण्यासाठी कॉंग्रेस सज्ज झाली आहे.

दरम्यान कॉंग्रेस या निवडणुकीत युवकाला संधी देणार असून प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब बापू सागर यांचे चिरंजीव युवा नेते तसेच सुप्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब भाऊसाहेब सागर यांचे नाव जवळ जवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे बाळासाहेब सागर हे कॉंग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता असून त्यांनी तसा साकूर गटात झंझावाती प्रचाराला सुरुवात केली आहे. पठार भागात बाळासाहेब सागर यांचा मोठा चाहता वर्ग आहे. प्रत्येकाच्या सुख दुःखात सागर कुटुंबिय सक्रिय असल्याचे बघायला मिळत आहे. सागर कुटुंबियांचा सर्वात मोठा परिवार आहे. साकूर गटातील प्रत्येक गावात त्यांचे नातेसंबंध जोडले गेले आहे. निवडणूकीच्या रिंगणात बाळासाहेब सागर उतरणार असल्याने त्यांनी होम टू होम प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी घेयला सुरूवात केली आहे.

तसेच बाळासाहेब सागर यांना मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. त्यांना सोशल मिडियातून देखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक युवकांनी त्यांना जाहिर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बाळासाहेब सागर यांची ताकद वाढताना दिसत आहे. सध्या बाळासाहेब सागर यांच पारडं जड असल्याची चर्चा आता साकूर गटात रंगली आहे. तसेच कॉंग्रेसच्या बाळासाहेब सागर यांना मतदारांची चांगलीच पसंती वाढत चालली आहे.

Leave a Comment