BREKING! महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

ठाकरे गटाचे उरलेले १३ आमदारही आमच्या संपर्कात असून, काँग्रेसच्या बड्या नेत्याने महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

उदय सामंत यांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यात मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा सुरू आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा अनेक चर्चा आहेत, ठाकरे गटाकडे उरलेले तेरा आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत.

राष्ट्रवादीचे २० आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत, तर काँग्रेसच्या बड्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वर येथे भेट घेतल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे.

Leave a Comment