पुणे–नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच गेली पाहिजे, आ. अमोल खताळ यांनी विधानभवनात वेधले लक्ष… 

संगमनेर(DSNews24) पुणे–नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच गेली पाहिजे या, संगमनेरकरांच्या एकमुखी मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना महायुती चे आमदार अमोल खताळ यांनी वरील मागणीचे घोषवाक्य लिहिलेले टी-शर्ट परिधान करत तसेच हातात फलक घेऊन थेट नागपूरच्या विधान भवनात पोहोचत लक्षवेधी आंदोलन केले त्यामुळे विधानभवनातील सर्वच जण आवाक झाले.

नारायणगाव जवळील जी एम आर डी (दुर्बीण) च्या अडथळ्याचे कारण देत पुणे नाशिक रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे करण्याचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी लोक सभेत सांगितले. त्यामुळे संगमनेरकर चांगलेच संतप्त झाले हा रेल्वेमार्ग संगमनेरमार्गेच झाला पाहिजे यासाठी आमदार अमोल खताळ यांच्यानेतृत्वा खाली जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे.आपल्याला संगमनेरचा जनतेने विधिमंडळात पाठवले आहे. त्यामुळे आपण सुद्धा या मागणीसाठी जनतेच्याबरोबर आहे.यासाठी आपण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठविणार असल्याचे जाहीर केले होते.

नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशना च्या दुसऱ्या दिवशी आमदार अमोल खताळ हे स्वतः पुणे नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर मार्गे झाला पाहिजे या प्रमुख मागणीचे बोर्ड हातात घेऊन विधान भवनात प्रवेश केला आणि संगमनेर कर जनतेची भावना शासनापर्यंत पोहोचवली . त्यांच्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनाचे राज्यभरामध्ये कौतुक होत आहे. पुणे नाशिक रेल्वे संगमनेरमार्गे व्हावी या मागणीसाठी अधिवेशन काळात पहिल्यांदा असे आंदोलन करणारे आमदार.अमोल खताळ हे पहिले लोकप्रतिनिधी आहेत अशी चर्चा विधानभवनात होत होती.

पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे ही मागणी होती. परंतु केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव यांनी अचानक हा मार्ग धोकादायक असल्याचे लोकसभेत जाहीर केले. त्यामुळे संगमनेरकरांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. जर कोणी यासाठी आडकाठी अनत असेल तर त्यासाठी जनआंदोलन केले जाईल. याबाबत आपण जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे ते आणि आम्ही मिळून जनआंदोलन करणार आहे काहींनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यात राजकारण केले परंतु ज्यांचा हेतू शुद्ध आहे अशांनाबरोबर घेऊन राजकारण विरहित आंदोलन केले जाईल

अमोल खताळ  – आमदार संगमनेर विधानसभा

Leave a Comment