आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

मिथुन : राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

सिंह : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

 

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

तूळ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

धनू : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

कुंभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

 

मीन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Leave a Comment