“त्या” घटनेने संगमनेर हादरले!

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका चार वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे चिमुकल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले असून जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

जवळे कडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. शनिवारी सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती त्याचवेळी चार वर्षीय चिमुकला सिद्धेश सूरज कडलग हा घराच्या दारात उभा होता, हीच संधी साधत गिन्नी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सिद्धेशला जागेवरच ठार केले. त्यानंतर त्याच्या वडिलांसह आजीने एकच आक्रोश केला.मात्र बिबटयाच्या हल्यात चिमुकल्याचा बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे.

Leave a Comment