…तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युती आणि आघाड्यांचे राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना दुसरीकडे राज्यात एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार, असा दावा केला जात आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तसा जाहीर दावा केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यानंत भाजपा तसेच शिंदे गटाच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. असे असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाविषयी मोठा दावा केला आहे.

…तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील

गुलाबराव पाटील यांना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानाविषयी विचारण्यात आले. यावर बोलताना, ‘प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत. त्यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या कामाची झलक पाहिली असेल. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना वाटत असेल की पुढच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील,’ असे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. तसेच प्रकाश आंबेडकर यांचे आशीर्वाद असतील तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असंही मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

Leave a Comment