संगमनेर(DSNews24 /किरण पुरी) तालुक्यातील साकूरसह परिसरातील गावांमध्ये बिबट्यांची दहशत बघायला मिळत आहे. तसेच बिबट्यांचे परिसरातील काही नागरिकांना दर्शनही झाल आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे त्या ठिकाणी वनविभागाने उपाययोजना म्हणून साकूरसह परिसरात एकूण ५ पिंजरे लावल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाने मांडवे बुद्रुक येथील डोलनर वस्ती, साकूर येथील पटेल वस्ती व सोनवणे वस्ती, जांबुत रोडलगत तसेच रणखांब येथील गुळवे वस्तीवर प्रत्येकी एक पिंजरा लावला आहे. यावर वनविभागाचे बाळासाहेब फटांगरे, देवराम केदार, बाळू शेंगाळ, लहानू देवके, अशोक जाधव, सय्यद शेख, बंडू कुदनर हे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
