नेवासा नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला आहे. महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. करणसिंग घुले विजयी झाले आहेत. किरण घुले नगराध्यक्ष होताच एकच जल्लोष करण्यात आला.
नेवासा नगरपंचायतीमध्ये गडाखांचा गड आला पण सिंह गेला. महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. माजी मंत्री शंकरराव गडाखांना धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदी महायुतीचे डॉ. करण सिंग घुले विजयी झाले आहेत. १७ पैकी १० जागा गडाखांच्या शेतकरी क्रांतीकारी पक्षाला मिळाल्या आहेत. तर ६ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
