बिग ब्रेकिंग! मतदानाआधीच महाराष्ट्रात भाजपचा पहिला विजय

कल्याण : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस काल संपला आहे. अर्ज भरण्याची मुदत संपताच भाजपने महाराष्ट्रात खातं उघडलं असून मतदानाआधीच त्यांचा पहिला नगरसेवक निवडून आला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपने खातं उघडलं आहे. पॅनल क्रमांक 18 अ मध्ये भाजप उमेदवार रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला, त्यामुळे रेखा चौधरी यांचा बिनविरोध निवडून यायचा मार्ग मोकळा झाला आहे.

18 अ प्रभागात ओबीसी महिला आरक्षित जागेसाठी भाजपच्या रेखा चौधरी यांचा एकच अर्ज आल्यामुळे जवळपास त्यांची उमेदवारी बिनविरोध झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी 31 डिसेंबरला उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार आहे.

या छाननीमध्ये रेखा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज मंजूर झाला तर त्यांचा बिनविरोध नगरसेवक व्हायचा मार्ग मोकळा होईल. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून रेखा चौधरी यांच्या कागदपत्रांची पडताळणी बुधवारी होईल, त्यानंतरच रेखा चौधरी या बिनविरोध निवडून आल्याची अधिकृत घोषणा केली जाईल.

Leave a Comment