संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील साईराम गृपच्या वतीने २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर असे श्री क्षेत्र बिरेवाडी ते श्री क्षेत्र शिर्डी असे साईबाबा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर दिंडीतील साईभक्तांनी साईबाबांच दर्शन घेतले. या दिंडीत जवळपास दोनशेहून अधिक साईभक्तांनी सहभाग घेतला होता.
तसेच या दिंडीची सांगता २ जानेवारी २०२६ रोजी होणार असून यानिमित्ताने सायंकाळी ७ ते १० या वेळेत बिरेवाडी येथील हनुमान मंदिरासमोर साई संगित भजन व भांडार गितांचा खास कार्यक्रम संपन्न होणार आहे. या खास सोहळ्याची जय्यत तयारी साईराम गृपच्या वतीने करण्यात येत आहे. कारण सारेगमपमधे आपल्या सुरांनी महाराष्ट्रात नावलौकिक मिळविणारे अविनाश कदम यांच्या आवाजात संगीत भजनाचा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. साईराम गृपच्या वतीने प्रथमच हा खास कार्यक्रम आयोजित केला असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच खास भांडार गितांसह साईंच भजन ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे या खास सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त साईभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन साई राम गृपच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या २० वर्षांपासून साईराम गृपच्या वतीने बिरेवाडी ते शिर्डी साईबाबा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करत आहे. पायी दिंडीचे यंदाचे हे एकविसावे वर्ष आहे. त्यामुळे गृपच्या वतीने चोख नियोजन केले होते. जवळपास २० वर्षांपासून या दिंडीने ही परंपरा जपली आहे. या पायी दिंडीचे प्रस्थान वार – सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बिरेवाडी गावठाण येथील हनुमान मंदीरापासून झाले होते. त्यानंतर या दिंडीचा पहिला मुक्काम पानोडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात तसेच दिंडीचा दुसरा मुक्काम वार – मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी लोणी येथील श्री लोमेश्वर मंदिर या ठिकाणी होता. साईबाबांच्या जयघोषाने ही दिंडी थेट शिर्डीत ३१ डिसेंबर रोजी दाखल झाली होती. यावेळी नववर्षाच्या निमित्ताने दिंडीतील सर्व साईभक्तांनी साईबाबांच मनोभावे दर्शन घेतले.
त्यानंतर १ जानेवारी २०२६ रोजी ही दिंडीने परतीचा प्रवास केला. दरवर्षी साईराम गृपच्या वतीने शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते. मात्र यंदाच्या वर्षी दिंडीच्या सांगतेला साईराम गृपने बिरेवाडीत साई संगित भजनाचा खास कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे साईभक्तांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांना साई संगिताच्या भजनाचा आनंद लुटता येणार आहे. सारेगमपचा मंच गाजवणारे गायक अविनाश कदम यांच्या आवाजात आता बिरे
