आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

मिथुन : वेळ वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कर्क : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

सिंह : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

कन्या : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

तूळ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल.

 

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

धनू : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

मकर : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

मीन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Leave a Comment